Posts

Showing posts from September, 2023

शिवारफेरी !!

Image
शिवारफेरी... आज आम्ही भेंडगाव ला जाणाऱ्या रसत्याने मुलांची शिवारफेरी काढली होती, रसत्याने जातांना बाजूच्या शेतीमध्ये, टूरु पक्षी आवाज करत होत, गोविंदाला सगळ्या मुलांच्या आधी हा आवाज ऐकायला आला, लगेच त्याने मला सांगितल दादा हा टूराचा आवाज आहे, मी म्हटल होय का...पुढे गोविंदा म्हणाला दादा यावेळेला ते अंड्यावर आले आहेत. तिखाडी, नदीतल्या कवसाळ गवतात बिया भरल्या आहेत तर! मी म्हटल तुला हे कस माहित झाल? पुढे तो म्हणाला मला सगळ माहित असते मी बाबा सोबत अधून मधून शिकारीला जात असतो ना म्हणून. नंतर गोविंदा नी आम्हाला भेंडगाव रसत्याने असणाऱ्या नाल्यातल्या वनस्पती झाडाची ओळख करून दिली. पोपटा, करमोडी, जेवारी, शेवरा, दुधी, क्ल्डू, कवसाळ काचकुरी या वनस्पती ची ओळख करून दिली. शिवारफेरी करून परत येतांना गोविंदा आम्हाला घोरपड ओळखण्याच तंत्र सांगत येत होता. बिडामध्ये घोरपड लपलीय की साप हे कस समजायचं तो आम्हाला उदाहरण देऊन सांगत होता. समजा बिडामध्ये साप लपलेला असेल तर बिडाच्या बाहेर मातीच्या गाठी पडलेल्या असतात, आणि घोरपड लपली असेल तर बिडा समोर त्याची नखं उमटलेली दिसतात. गोविंदा निसर्ग निरीक्षणाच हे ज्ञान...