Posts

Showing posts from December, 2022
Image
आमचा वर्ग आज आम्ही अक्षरभूमी शाळा मध्ये मुलासोबत हावभाव (Expression) या विषयावर'च सञ घेतल. बोलतांना, हसतांना, रागावतांना, शांतमनी, रुसलेल्या, ओरडतांना माणसाच्या चेहर्‍यावरच्या हावभावाची चिञ आम्ही मुलांना काढायला लावली.यावेळी,अक्षरभूमीतल्या मुलामुलींना दाढी, डोळे, कान, नाक, गळा, पापन, केस, ओठ, दात, अशा चेहर्‍यावरच्या अवयवाची ओळख झाली आणि त्याच महत्व समजल. या विशेष सञामधुन आम्हाला मुलामधल्या चागंल्या आणि मुलांना न आवडणार्‍या गोष्टीच निरीक्षण करता आल. वर्गातल्या गायञी आणि वेदीका या मुलींनी लहान चिञ काढली होती. नतंर त्या काढलेल्या चिञाची त्यांनी खोडतोड केली. आपण काढलेल चिञ शाळेच्या दादाला आवडणार नाही म्हणुन त्या दोघीनी वर्गातुन बाहेर पडुन जाण्याचा प्रयत्न केला. या सञात आम्ही आईसक्रिम स्टीक, काळा दोरा, वेस्टेज पेज, कलरपेन्शील, ग्लू, अशा साहीत्याचा वापर केला. हे सञ घेण्यासाठी आमचे शिक्षण मिञ मंगेश पवार च महत्वाच सहकार्य मिळाल. #creativity#craft #educationmatter #education#learning #ruralindiaeducation #helpAksharbhumi #Zeporg