Posts

रेषांच्या वाटेने शिकण्याचा आनंद.

Image
आज आमच्या झेप लर्निंग सेंटरमध्ये मुलांसोबत एक साधी वाटणारी, पण खूप काही शिकवून जाणारी ॲक्टिव्हिटी घेण्यात आली. व्हाईटबोर्डवर वळणावळणाच्या रेषा काढून त्यामध्ये काही घरे आणि एक शाळा दर्शवण्यात आली होती. मुलांना त्यांच्या घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग शोधायचा होता. पहिल्या नजरेत मुलांना हा एकखेळवाटला पण मुलं जेव्हा या रेषांचा मागोवा घेऊ लागली, तेव्हा शिकण्याची एक वेगळीच प्रक्रिया सुरू झाली. कोणती वाट योग्य असेल? कुठे वळायचे? कोणता मार्ग शाळेपर्यंत पोहोचवेल? अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना मुलं सतत विचार करत होती, निर्णय घेत होती आणि स्वतःच्या निरीक्षणांचा वापर करत होती. या प्रक्रियेदरम्यान मुलांनी त्यांच्या रोजच्या शाळेच्या प्रवासाबद्दलही सांगितले. घरापासून शाळेपर्यंत जाताना त्यांना दिसणारी झाडे, घरे, दुकाने, मंदिर, रस्ते, त्यांचे रंग आणि आकार याबद्दल त्यांनी उत्साहाने चर्चा केली. एका साध्या रेषेने मुलांच्या अनुभवविश्वाचे दार उघडले होते. या लेसन चे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलांना दिलेले स्वातंत्र्य. त्यांना कोणताही तयार मार्ग किंवा उत्तर देण्यात आले नाही. प्रत्य...

जगण्यासाठीच्या सवयींपासून सजग शिक्षणाकडे !!

Image
आज दुपारी घडलेला एक छोटासा प्रसंग आमच्या समोर अनेक मोठे प्रश्न समोर आणून गेला. आमच्या झेप लर्निंग सेंटर मध्ये शिकायला येणारी पाचवीतील तीन मुलं त्यांच्या नेहमीच्या शाळेच्या रस्त्यावर एका हिवरच्या झुडपाजवळ उभी होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्या झुडपात इंडियन स्पॉटेड डव्ह (ठिपकेदार कबुतर) या पक्ष्याचे घरटे पाहिले होते. त्या घरट्यात अंडीही होती. सुरुवातीला हे त्या मुलासाठी केवळ कुतूहल होते; मात्र काही दिवसांतच ते कृतीत उतरले.मुलांनी झुडपाभोवती साधे फासे लावले होते. ती मुल चर्चा करत होती, विषय होता पक्षी कसा पकडायचा आणि कुठे विकायचा. एका मुलाने सांगितले की हा पक्षी पन्नास रुपयांना विकता येईल आणि मिळालेली रक्कम आपापसात वाटून घेता येईल. त्याच वेळी त्यांनी ही गोष्ट आई-वडिलांपासून लपवण्याचेही ठरवले.काही वेळ निरीक्षण केल्यानंतर त्यांनी पाहिले की पक्षी पुन्हा अंड्यांवर बसण्यासाठी घरट्यात आली आहे. योग्य संधी साधून ते घरट्याजवळ गेले. काही क्षणांतच पंखांची जोरदार फडफड झाली आणि पक्षी त्यांच्या तावडीत सापडला. पक्षी पकडल्याच्या आनंदात ते रस्त्यावर धावत सुटले.जेव्हा त्यांना थांबवून विचारणा करण्यात ...

कोळशांची गंमत.

Image
मयुरेशचं बालपण स्थलांतराच्या प्रवासात गेलं. प्रत्येक हंगामात तो आपल्या आई–बाबांसोबत गाव सोडून कापूस वेचणीसाठी दूरवरच्या शेतांवर जायचा. दिवसभर आई–बाबा आणि इतर मजूर शेतात कापूस गोळा करत, आणि जवळच असलेल्या रेल्वे रुळांवरून गाड्या आवाज करत पुढे जात असत. लहान मयुरेशचं दिवसाचं मनोरंजन म्हणजे त्या गाड्या पाहणं. मोठमोठ्या मालगाड्या जाताना त्याच्या डोळ्यांत कौतुक चमकत असे. एका दुपारी असंच काम सुरू असताना एक मालगाडी जाताना तिच्या एका डब्यातून कोळसे खाली पडले. काळेभोर, चमकदार कोळसे रुळांच्या बाजूला विखुरले होते. मयुरेश आणि त्याचे सोबतचे काही मित्र लगेच धावत रुळावर गेले, त्यांनी ते कोळसे वेचून घेतले. संध्याकाळी बिराडवर परतल्यावर मयुरेशने ते जमा केलेले कोळसे आगीत टाकुन पहिलं चुल्ही मधल्या आगीच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये ते कोळसे सुध्दा पेट घ्यायला लागले हे पाहून मयुरेश ला भारी गंमत वाटली. . . #झेप संस्था#अक्षरभूमी #मुलं #बालपणाच्या_आठवणी #स्थलांतरित_जीवन #गावाची_गोष्ट #मयुरेशचीकथा #ZEPStories

मुलांचे प्रश्न !!

Image
नेहमी प्रमाणे संध्याकाळी झेप लर्निंग सेंटर मध्ये वर्ग भरायला आम्ही जमलो. दिव्या, पारू, मयुरेश, प्रशांत पूर्वा अशी सगळी मुल सेंटर वर आली. आज ही मुल सेंटर मध्ये येऊन नुसती धिंगाणा करत होती. वर्गात इकडे तिकडे लोळत होती. मध्ये दिव्या आणि पूर्वा मला येऊन म्हणाली दादा आम्हाला ना तुम्हाला डान्स करून दाखवायचा आहे. मी होय दाखवा म्हटल्यावर दिव्या आणि पूर्वा राधा हे गात गात डान्स करून दाखवायला लागल्या, नंतर बायको नखरेवाली हे गान गात डान्स करायला लागल्या त्याच्या मध्ये मयुरेश आणि सुरज ही येऊन डान्स दाखवत होता. मुलींचा डान्स झाल्या नंतर पारू नी आपलं शाळेतलं पुस्तक आणलं आणि कविता वाचून दाखवायला सुरवात केली मला न विचारता उद्देश होता दादा नी माझ ऐकल पाहिजे माझी स्तुती केली पाहिजे. तुकाराम धांडे नी लिहिलेली रानवेडी ही कविता होती पोर डोंगराव भाळली रान गवताची फुलं तिच्या कानामधी डूल अस काहीस वाचतांना मला मुलांच्या बडबड मध्ये ऐकू आलं. नंतर दिव्या जवळ येऊन मला म्हणाली दादा मी नारे घेणार आहे शाळेत २६ जानेवारी ला मी म्हटल अरे वाह खूपच छान. आज सेंटर मध्ये मला दुसर काहीही शिकवायला जमलं नाही. रात्री घरी आल्याव...

अंतरंग

Image
अंतरंग आज अक्षरभूमी मध्ये माइंड मापींग लेसन घेतलं नेहमी प्रमाणे वर्गात मी मुलांना सांगितले तुमच्या मनात काय विचार येत आहे हे प्रत्येकाने एका शब्दात सांगा मुलांनी सांगितले मला कंटाळा येत आहे, मला भूक लागली आहे, मला शरम वाटत आहे अस सगळं सांगितलं. नंतर मी मुलांना विचारलं काल बेड्या वर, तुमच्या घरी किंवा तुमच्या सोबत काही झालं का आणि ते मला सांगू शकाल? लगेच गायत्री नावच्या मुलीने सांगितले होय दादा काल ना आमच्या बेड्या वरच्या मुलाने ओषध (Poison) घेतली आणि पुढे गायत्री ने झालेला सगळा घटना क्रम सांगितला ज्या ठिकाणी त्या तरुणाने ओषध घेतली तिथून बाहेर गावच्या लोकांनी त्याला दवाखाण्यात उचलून नेलं. झालेल्या प्रकाराने बेड्या वरील बाया माणसं घाबरून गेली होती अस गायत्री म्हणाली. वर्गात ही गोष्ट गायत्री ची ऐकतांना इतर मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. मोठ्या माणसांच्या कृतीच लहान मुलावर परिणाम होतो अस वर्गातल्या मुलांकडे पाहून वाटतं होत. मोठ्या माणसांच्या अनेक गोष्टी वर लहान मुलाच लक्ष असतं हे गायत्रीच्या गोष्टीतून मला समजलं. पुठे दिपिका म्हणाली माझा बल्या दादा रात्री शिकारी साठी गेला होत...

शाळेचा दुसरा दिवस..

Image
शाळेचा दुसरा दिवस.. मयूरेश चा आज सेंटर मध्ये येण्याचा दुसरा दिवस होता, वर्गात तो शेवट च्या चटई वर बसला होता. सोबतीला त्याच्या शेजारी तेजू बसली होती, मयुरेश च लक्ष सेंटर च्या भिंती वर रंगवलेल्या चित्रावर जात होत, तो प्रत्येक चित्र खूप लक्ष देऊन पाहत होता, नंतर मयुरेश सेंटर मधल्या कपाटा कडे पाहत होता, वरती ठेवलेल्या पुस्तकांच्या गठ्ठ्या वर त्याची नजर जात होती. नंतर मग प्रार्थनेची वेळ झाली आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना दिल्या मुलमुली सेंटरच्या वऱ्हांड्यात जमली, राष्ट्रगीता पासून प्रार्थनेला सुरुवात झाली. मग सेंटर मधल्या दादा ने भारतीय संविधानाची प्रस्ताविका वाचली मुल दादाच्या मागे मागे म्हणत होती. मयुरेश पहिल्या दिवशी त्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेला होता, सेंटर मध्ये आल्यावर त्याने सांगितले सरांनी त्याला छडी मारली होती, आम्ही त्याच कारण विचारलं तर मयुरेश म्हणाला माझ वर्गात मन लागत नव्हतं, मी सारखा शाळेच्या दरवाज्या मधून घराकडे यायला गडबड करत होतो त्यामुळे मला सरांनी हातावर छडी मारली. मयुरेश सहित आम्ही सेंटर मधल्या इतर मुला मुलींना अंक वाचन करायला सांगितल परंतु मुल ती ...

मुल दिवसभर काय करतात.

Image
मुल दिवसभर काय करतात. आमच्या सेंटर मध्ये शिकायला येणाऱ्या मुलाचं आयुष्य, आणि प्रत्येक मुलामुलीचा दिनक्रम विचार करायला लावणारा असतो. झाल अस कि युरोप मध्ये राहणारा आमचा एक मित्र निकोलस नी या मुलासाठी चार हजार रुपये पाठवले होते. त्या पैशाचे मुलासाठी वह्या, पेन, पेन्शील, खोडरबर, शाप्नर, चित्रकलेच्या वह्या अस सगळं साहित्य आणलं. आणि आज वडाळा येथील झेप लर्निंग सेंटर मध्ये ते मुलांना दिले. साहित्य देऊन झाल्यावर संजना ही मुलगी पंधरा मिनिट उशिरा सेंटर मध्ये आली. तर संजनाची दुसरी मैत्रीण पूर्वा तिला म्हणाली झिपरी तु आता आली व्ह्य.. आम्हाला तर वह्या देऊन झाल्या आहेत. संजना ला सेंटर मध्ये यायला उशीर का झाला हे मी विचारल्यावर, ती म्हणाली दादा आज मी गाई चारण्यासाठी रानात आई सोबत गेली होती. पुढे मी विचारलं आज तुझे बाबा कुठे गेले होते? त संजना म्हणाली बाबा आज शेलु बाजार ला गेले होते कोंबड्या आणण्यासाठी. मी म्हटलं अच्छा छान मदत केली आहेस मग तु आज आई बाबांना. नंतर आम्ही तिला वही, पेन, पेन्शील, दिली आणि वर्गात बसायला सांगितलं. संजना सारख्या मुली घरच्या इतक्या साऱ्या मोठ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून झ...