Posts

Showing posts from December, 2023

शिक्षणाच्या प्रयोगात भेटलेली मुले गोष्ट २

Image
शिक्षणाच्या प्रयोगात भेटलेली मुल गोष्ट २ आज संध्याकाळी वडाळा गावच्या झेप लर्निंग सेंटर मध्ये वर्ग घेण्यासाठी आम्ही सगळे जमलो होतो. सत्र सुरु होण्याआधी मुलासोबत आमच्या अशाच काहीबाही चर्चा सुरु होत्या, इतक्यात इंदल सेंटर मध्ये आला. इंदल अधून मधून सेंटर मध्ये येतो. सोपान इंदल चा वर्ग मित्र आहे, इंदल ला वर्गात आलेला पाहून सोपान म्हणला दादा हा आज मला सांगत होता मी सुद्धा या वर्षी बोर्डाची परीक्षा देऊ शकलो असतो. सोपानच बोलण एकूण मी म्हटल हो रे इंदल खरय का? इंदल म्हणाला होय दादा...मग पुढे का शिकला नाही? अस विचारल्या वर इंदल आणि सोपान त्याच्या वसतिगृहा मध्ये शिकत असतांना त्यांना आलेले अनुभव मला सांगायला लागले. दोघाकडून ऐकल्यावर समजलं, इंदल सोबत वसतिगृहा’मध्ये शिकत असतांना मोठ्या मुलाकडून हिंसक अमानुष अत्याचार झालाय. कधी ते इंदलच्या तोंडात पाण्याचा नळ चालू करून दाबत असत, कधी लाईट बंद करून इंदल ला मारायचे, तर कधी बिस्कीटचा पूर्ण पुडा तोंडात जबरदस्तीने कोंबायचे आणि ते बिस्कीट पूर्ण गिळायला लावत होते. इंदल toilet ला जायचा तर मोठी मुल बाहेरून दरवाजा बंद करुन द्यायची. इंदल सोबत हा सगळा अत्याचार ...