वर्गातल्या गोष्टी...
वर्गातल्या गोष्टी... अक्षरभूमी शाळेत शिकायला येणाऱ्या गट्टू च्या बाबानी बाहेर गावातल्या गाई महिन्याने चरायला घेतल्या आहेत, एक दिवस त्यांना रानात गाई चारतांना तितराची(gray froncolin bird)अंडी दिसली, संध्याकाळी गट्टू च्या बाबाने गट्टू ला सांगितलं आज मी रानात चील्हाटी च्या झुडपां खाली तितराचे अंडे पहिले आहेत, उद्या आपण त्या तितराला पकडायला जाऊ या. बाबाची ही गोष्ट ऐकुण गट्टू ला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी गट्टू नी वर्गातला मित्र सजन ची सोबती केली, खन्दारू आणि जाळी घेऊन बाबाच्या मागे रानात गेले, गट्टू म्हणाला दादा आम्ही बाबा सोबत गेलो रानात तर खरच चील्हाटी च्या झुडूपात तितर बसलेला होता. बाबा ने आम्हाला हो हो असा आवाज करायला सांगितला, हा आवाज ऐकुण तितर आंग चोरून घरट्यात दबायला लागला. बाबाने चील्हाटी च्या झुडुपावर अलगत जाळी फेकली. आणि समोरच्या बाजूने जाऊन तितरावर माती छीडकायला लागला, माती तितराच्या अंगावर पडल्याने खडबडून तितर उडाला आणि जाळ्यात जाऊन अडकला. शिकार साधली बाबाने जाळ्यातून तो तितर बाहेर काढला आणि तितराच्या दोन्ही पाखड्या वरचे पख कमी करून आमच्या हातामध्ये दिला, तेव्हा मला...