शिक्षणाच्या प्रयोगात मला भेटलेली मुल...
शिक्षणाच्या प्रयोगात मला भेटलेली मुल.. २०१९ मध्ये टन्या आणि त्याचे आई बाबा यवतमाळ जिल्यातल्या मालवागत गावातुन स्थालांतरीत होऊन वर्षातल्या चार महीन्यासाठी टिटवा गावाला कमाईसाठी यायचे, या काळात टन्या आणि त्याचे बहीणभाऊ बाली, चेतन, लाही अक्षरभूमी शाळेत आम्ही शिकवत होतो.एका दिवशी मी अक्षरभूमी शाळेवर गेलो मुलासोबत अक्षर ओळख या विषयावर वर्ग घेतला, वर्ग संपल्यावर टन्या मला म्हणाला दादा तुम्हाला एक गम्मत दाखऊ का मी म्हटल दाखवत त. चला त्या तलावाच्या काठाने तुम्हाला पिलपिल्या (Red-vented bulbul) ची काळी कबरी अंडी दाखवतो, टन्या ने सांगीतल्या प्रमाणे आम्ही वर्गातल्या इतर मुलामुली सहित त्याच्या सोबत गेलो. खरेच पळसाच्या झाडाखाली एक हेकल्याच झुडूप होत त्या झुडपात पिलपिल्याने घरट केल होत, पण त्यामध्ये आता अंडी नव्हती टन्या ते घरट पाहून म्हणाला अरे दादा यातली अंडी कुठे गेली... मी म्हटल पिल उबऊन उडाली असेल. टन्या म्हणाला नाही ना दादा मी तीन दिवसा आधीच तर पाहीली होती नक्कीच चांडवा (Barred owl) ने खाल्लीय आणि त्याने समोरच्या भिंगरीच्या झाडावर बसलेली दोन चाडंवा पक्षी मला दाखवले. टन्याला पुर्ण खाञी होत...