गट्टू ची गोष्ट !!
गट्टू ची गोष्ट !! अक्षरभूमी शाळेमध्ये गेले चार वर्ष काम करत असतांना अनेक मुल’मुली आयुष्यात आली या मुलांना अधिक जवळून मला समजून घेता आलं, या मुलांना शिकवतांना आम्ही अनेक पद्धती वापरल्या शाळेतली पुस्तक, गोष्टीची पुस्तक, गाणी खेळ असे सगळे प्रयोग करून पाहिले, परंतु अक्षरभूमी मध्ये येणाऱ्या मुलाचं एक वेगळच जग आहे हे नतंर नंतर माझ्या लक्षात येत गेल. शिक्षणाच्या या प्रयोगात गोविंदा, तन्या, बाली, गट्टू सारखी ही मुल मला विशेष लक्षात राहिली आणि ती प्रभावित करून गेली. या मुलांन मध्ये निसर्गताच अफाट क्षमता गुणवत्ता आहेत हे कळल. आज गट्टू ची ही गोष्ट तुम्हाला सांगायला मला आवडणार आहे. गट्टू सध्या सातव्या वर्गात जवळच्या जि प शाळेत पुढच्या शिक्षणा करीता शिकायला गेला आहे, गट्टू मध्ये आभ्यासा व्यतिरिक्त बाहेरच्या शेती, रान, नाले, ओढ्यातल्या गोष्टी निरीक्षण करून शिकण्याची क्षमता सोबतच्या वर्गातल्या सगळ्या मुला’पेक्षा कही जास्त आहे. गट्टू ला आम्ही वाचायला लिहायला देतो. कधी कधी त्याला हे लिहावच लागेल तस लिहाव लागेल म्हटल तर तो आवडीने लिहित नाही, आम्ही सांगितलेल्या कुठल्याही खेळात तो मनाने सहभाग घेत नाही, ए...