शिक्षणाच्या प्रयोगात मला भेटलेली मुल...

शिक्षणाच्या प्रयोगात मला भेटलेली मुल.. २०१९ मध्ये टन्या आणि त्याचे आई बाबा यवतमाळ जिल्यातल्या मालवागत गावातुन स्थालांतरीत होऊन वर्षातल्या चार महीन्यासाठी टिटवा गावाला कमाईसाठी यायचे, या काळात टन्या आणि त्याचे बहीणभाऊ बाली, चेतन, लाही अक्षरभूमी शाळेत आम्ही शिकवत होतो.एका दिवशी मी अक्षरभूमी शाळेवर गेलो मुलासोबत अक्षर ओळख या विषयावर वर्ग घेतला, वर्ग संपल्यावर टन्या मला म्हणाला दादा तुम्हाला एक गम्मत दाखऊ का मी म्हटल दाखवत त. चला त्या तलावाच्या काठाने तुम्हाला पिलपिल्या (Red-vented bulbul) ची काळी कबरी अंडी दाखवतो, टन्या ने सांगीतल्या प्रमाणे आम्ही वर्गातल्या इतर मुलामुली सहित त्याच्या सोबत गेलो. खरेच पळसाच्या झाडाखाली एक हेकल्याच झुडूप होत त्या झुडपात पिलपिल्याने घरट केल होत, पण त्यामध्ये आता अंडी नव्हती टन्या ते घरट पाहून म्हणाला अरे दादा यातली अंडी कुठे गेली... मी म्हटल पिल उबऊन उडाली असेल. टन्या म्हणाला नाही ना दादा मी तीन दिवसा आधीच तर पाहीली होती नक्कीच चांडवा (Barred owl) ने खाल्लीय आणि त्याने समोरच्या भिंगरीच्या झाडावर बसलेली दोन चाडंवा पक्षी मला दाखवले. टन्याला पुर्ण खाञी होती ती अंड्डी चांडवानेच खाल्ली आहेत, टन्या रोजच या तलावाच्या काठाने भटकतांना त्या घरट्याच निरीक्षण करत होता. पुढे आम्ही अक्षरभूमी शाळेकडे परत यायला निघालो वाटेत टन्या मला त्याला दिसणारे पक्षी दाखवत होता टन्याला (Tylor bird) दिसल आणि म्हणाला दादा मला हे पक्षी खुप आवडतं त्याची पिल्ल चिट्या आगंळी एवढी असतात, पुढे टन्यानी पाहीलेल्या बगळ्याच्या प्रजाती किती असतात ते सागंत होता. आणखी काही दिवसापुर्वीच त्याने शेतीच्या एका धुर्‍याने (बांध) टिटवीची (lapwing) अंडी पाहीली होती अस सांगीतल पुढे तो म्हणाला माझे आजोबा म्हणतात टिटवीच्या अंड्याच्या टोकाची दिशा पाहून मान्सुन कधी येणार आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. आणि पुढे टन्या म्हणाला टिटवी एकावेळी चार ते सहा अंडी देऊ शकते, टन्याच निसर्ग आणि पक्ष्यांच्या वागणूकी बद्दलच त्याच ज्ञान मला सारख विचारात पाडत होत. अक्षरभूमी शाळेवर पोहचल्यावर टन्याला मी म्हणालो उद्याही तु शाळेत येणार आहे ना? टन्या मला म्हणाला नाही नाही दादा अद्या नाही माझ येण होणार. आज संध्याकाळ पर्यंत समजा पाऊस आला तर मला सकाळी बाबासोबत शिकारीला जाव लागेल मी म्हटल अरे अस आहे का पुढे तो म्हणाला पाऊस पडुन गेल्यावर सशे आणि तितरांच्या पावलाचे ठस्से जमिनीवर स्पष्ट दिसतात, पावलाच्या ठस्यामुळे शिकारीचा माग पाठलाग करायला सोप्प जात. पावसात शिकार करण्याचा आमच्यासाठी चागंला सिजन असतो, तेव्हडी'च बाबाला मदत होते म्हणून जाव लागेल. बालपणातच टन्याला मिळालेल अस शहाणपण मला स्पर्शुन गेल, टन्या सारख्या असंख्य फासेपारधी समुदायातल्या मुलामुलींना लिहीत वाचत करणं आणि त्यांना शाळेत दाखल करणं तेव्हा खुप मोठ आव्हान माझ्या समोर होत. फासेपारधी समुदायातला परपंरागत शिकार व्यवसाय, आणि त्या शिकारीपाई पालकांच होणार दरवर्षाच स्थालातंर आणखी बेडा, तांड्या पासुन दुर असणार्‍या शाळा, मुलाच्या भाषेच्या अडचणी असे सगळे प्रश्न होते. नंतर मिञ मंगेश पवार ची साथ मला मिळाली. आता या सगळ्या आव्हाना'वर उत्तर शोधण्याचा शिक्षणाचा प्रयोग आम्ही अक्षरभूमी शाळेच्या माध्यमातुन करत आहोत.!! ---

Comments

Popular posts from this blog

कोळशांची गंमत.

जगण्यासाठीच्या सवयींपासून सजग शिक्षणाकडे !!

अंतरंग