गट्टू ची गोष्ट !!
गट्टू ची गोष्ट !!
अक्षरभूमी शाळेमध्ये गेले चार वर्ष काम करत असतांना अनेक मुल’मुली आयुष्यात आली या मुलांना अधिक जवळून मला समजून घेता आलं, या मुलांना शिकवतांना आम्ही अनेक पद्धती वापरल्या शाळेतली पुस्तक, गोष्टीची पुस्तक, गाणी खेळ असे सगळे प्रयोग करून पाहिले, परंतु अक्षरभूमी मध्ये येणाऱ्या मुलाचं एक वेगळच जग आहे हे नतंर नंतर माझ्या लक्षात येत गेल. शिक्षणाच्या या प्रयोगात गोविंदा, तन्या, बाली, गट्टू सारखी ही मुल मला विशेष लक्षात राहिली आणि ती प्रभावित करून गेली. या मुलांन मध्ये निसर्गताच अफाट क्षमता गुणवत्ता आहेत हे कळल. आज गट्टू ची ही गोष्ट तुम्हाला सांगायला मला आवडणार आहे.
गट्टू सध्या सातव्या वर्गात जवळच्या जि प शाळेत पुढच्या शिक्षणा करीता शिकायला गेला आहे, गट्टू मध्ये आभ्यासा व्यतिरिक्त बाहेरच्या शेती, रान, नाले, ओढ्यातल्या गोष्टी निरीक्षण करून शिकण्याची क्षमता सोबतच्या वर्गातल्या सगळ्या मुला’पेक्षा कही जास्त आहे. गट्टू ला आम्ही वाचायला लिहायला देतो. कधी कधी त्याला हे लिहावच लागेल तस लिहाव लागेल म्हटल तर तो आवडीने लिहित नाही, आम्ही सांगितलेल्या कुठल्याही खेळात तो मनाने सहभाग घेत नाही, एखाद्या दिवशी आमच वर्गात खेळण्याच ठरल की तो एका कोपऱ्यात जाऊन उभा राहतो आणि आमचे खेळ पाहतो. हे लक्षात आल्यावर वर्ग संपला की एकट्यात मी गट्टू सोबत संवाद साधत असतो, गट्टू सोबत बोलता बोलता त्याच्या मनात लपून राहीलेल्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात मग, गट्टूला शेती मधल्या सगळ्या गोष्टी येतात. विहिरीत मोटर बसवण्या पासून तर, स्पिक्लरचे टप्पे बदलण्याच्या पद्धती, या सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थीत येतात, शिवाय गट्टू ला स्वयपाक बनवायला ही खूप आवडत हे त्याच्याशी बोलल्यावर माहीत झालं.
मागच्या महिन्यात आम्ही वडाळा येथील झेप लर्निंग सेंटर आणि अक्षरभूमी’तल्या मुलांमुलींचे कब्बडी सामने आयोजित केले होते. त्या दिवशी दुपारी अक्षरभूमी मध्ये खिचडी रांधण्याचा आमचा बेत ठरला. कब्बडी खेळून दमून झाल्यावर सगळी मुल वर्गात बसली होती. गट्टू मात्र अक्षरभूमी परिसरातल सुकलेल इंधन खिचडी रांधण्यासाठी जमा करून आणून ठेवत होता. अक्षरभूमी’तले शिक्षण मित्र मंगेश पवार ने गट्टू ला खिचडी रांधण्यासाठीच साहित्य तयार करायला सांगितल. गट्टूनी ते सबन आनंदाने केल. गट्टू ला पाहून खिचडी रांधण्याच्या चुल्ही जवळ बाकीची मुलही जमा झाली. गट्टू त्या मुलांना सांगत होता, मी सगळ रानधायचं बघतो तुम्ही निवांत वर्गात बसा. खिचडी तयार झाल्या नंतर सगळ्या मुला’मुलींनी अक्षरभूमी शाळेच्या अंगणातल्या पळसाच्या झाडाची पाने तोडून आणली आणि मस्त त्यावर खिचडी घेऊन खाल्ली.
गट्टू सारख्या मुलाबरोबर शिक्षणाचकाम करतांना मला एक लक्षात येत गेल की आपण या मुलांना शाळेतल्या पुस्तका मधल्या, कोणत्याही अभ्यास क्र्मातल्या गोष्टी एकादमाने शिकऊ शकत नाही, तर अशा मुलामध्ये काय विशेष गुण आहेत त्याला कोणत्या गोष्टी करायला आवडतात, या मुलांच्या घरी काय गोष्टी रोज घडतात त्या त्या गोष्टी, घटना संवादातून बाहेर काढणं तस वातावरण शाळेत, वर्गामध्ये मुलांना तयार करून देनं म्हणजे शिक्षण, शिक्षणावरच काम ही गोष्ट मला समजली. !!
साहेबराव २५ जुलै २०२३

Comments
Post a Comment