शिक्षणाच्या प्रयोगात भेटलेली मुले गोष्ट २
शिक्षणाच्या प्रयोगात भेटलेली मुल गोष्ट २
आज संध्याकाळी वडाळा गावच्या झेप लर्निंग सेंटर मध्ये वर्ग घेण्यासाठी आम्ही सगळे जमलो होतो. सत्र सुरु होण्याआधी मुलासोबत आमच्या अशाच काहीबाही चर्चा सुरु होत्या, इतक्यात इंदल सेंटर मध्ये आला. इंदल अधून मधून सेंटर मध्ये येतो. सोपान इंदल चा वर्ग मित्र आहे, इंदल ला वर्गात आलेला पाहून सोपान म्हणला दादा हा आज मला सांगत होता मी सुद्धा या वर्षी बोर्डाची परीक्षा देऊ शकलो असतो. सोपानच बोलण एकूण मी म्हटल हो रे इंदल खरय का? इंदल म्हणाला होय दादा...मग पुढे का शिकला नाही? अस विचारल्या वर इंदल आणि सोपान त्याच्या वसतिगृहा मध्ये शिकत असतांना त्यांना आलेले अनुभव मला सांगायला लागले.
दोघाकडून ऐकल्यावर समजलं, इंदल सोबत वसतिगृहा’मध्ये शिकत असतांना मोठ्या मुलाकडून हिंसक अमानुष अत्याचार झालाय. कधी ते इंदलच्या तोंडात पाण्याचा नळ चालू करून दाबत असत, कधी लाईट बंद करून इंदल ला मारायचे, तर कधी बिस्कीटचा पूर्ण पुडा तोंडात जबरदस्तीने कोंबायचे आणि ते बिस्कीट पूर्ण गिळायला लावत होते. इंदल toilet ला जायचा तर मोठी मुल बाहेरून दरवाजा बंद करुन द्यायची.
इंदल सोबत हा सगळा अत्याचार झाल्यामुळे तो सध्या खूप घाबरा झालेला आहे. इंदल सोबत होत असलेला हा छळ घरी तो सांगू शकत नव्हता, त्याच कारण त्याला तेव्हा जीवाने मारण्याची धमकी दिली जात होती. आता शाळा सोडून तो त्याच्या बाबा’ला शेती मध्ये कामात मदत करत असतो. इंदल सोबत हा सगळा अत्याचार झाल्यामुळे तो मानसिक दुष्ट्या खूप भित्रा झालेला आहे, परिणामी घरात आणि गावातले सोबतचे मित्र ही त्याला कमी बुद्धीचा,गयबाल्या म्हणून सतत हिणवतात. त्याने ही ते गपचूप स्वीकारलं आहे हे त्याच्या बोलण्यातून आज समजलं.
काही महिन्या आधी इंदल चे आई बाबा मला भेटले होते, ते म्हणत होते माझा मुलगा तुमच नाव काढतो दादा खूप चांगले आहेत म्हणतो. पुढे ते म्हणत होते तुम्हाला हवे इतके पैसे घ्या पण माझ्या मुलाला तुमच्या शाळेत शिकवा. इंदल सोबत वसतिगृहात झालेल्या अत्याचारामुळे पुन्हा एकदा वसतिगृहातलं खर रूप समोर आलय. सत्र संपल्यावर संध्याकाळी वर्गातली सगळी मुलमुली घराकडे परत रसत्याने येत होतो तेव्हा मी इंदल ला सांगितल तु खुप हुशार मुलगा आहेस. तु मला आणि सेंटर मधल्या सगळ्या मुलांना आवडतोस हे तुझ्या सगळ्या नातलगांना सांग.
इंदल सारखी मुल आमच्या समोर येऊन त्याच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी हिंमतीने व्यक्त होऊ शकतात, त्याच कारण झेप लर्निंग सेंटर मध्ये शिकायला येणाऱ्या प्रत्येक मुलाच स्वातंत्र्य जपलं जातं, त्याच्या प्रत्येक कृतीचा गोष्टी चा आमच्या सेंटर मध्ये सन्मान केला जातो. !!
- साहेबराव राठोड
अक्षरभूमी शाळा, झेप संस्था. अकोला.

Comments
Post a Comment