कोळशांची गंमत.
मयुरेशचं बालपण स्थलांतराच्या प्रवासात गेलं. प्रत्येक हंगामात तो आपल्या आई–बाबांसोबत गाव सोडून कापूस वेचणीसाठी दूरवरच्या शेतांवर जायचा. दिवसभर आई–बाबा आणि इतर मजूर शेतात कापूस गोळा करत, आणि जवळच असलेल्या रेल्वे रुळांवरून गाड्या आवाज करत पुढे जात असत.
लहान मयुरेशचं दिवसाचं मनोरंजन म्हणजे त्या गाड्या पाहणं. मोठमोठ्या मालगाड्या जाताना त्याच्या डोळ्यांत कौतुक चमकत असे.
एका दुपारी असंच काम सुरू असताना एक मालगाडी जाताना तिच्या एका डब्यातून कोळसे खाली पडले. काळेभोर, चमकदार कोळसे रुळांच्या बाजूला विखुरले होते. मयुरेश आणि त्याचे सोबतचे काही मित्र लगेच धावत रुळावर गेले, त्यांनी ते कोळसे वेचून घेतले.
संध्याकाळी बिराडवर परतल्यावर मयुरेशने ते जमा केलेले कोळसे आगीत टाकुन पहिलं चुल्ही मधल्या आगीच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये ते कोळसे सुध्दा पेट घ्यायला लागले हे पाहून मयुरेश ला भारी गंमत वाटली.
.
.
#झेप संस्था#अक्षरभूमी
#मुलं #बालपणाच्या_आठवणी #स्थलांतरित_जीवन #गावाची_गोष्ट #मयुरेशचीकथा #ZEPStories


Comments
Post a Comment