शिकण्याआधी संवाद महत्वाचा !!

शिकण्या आधी संवाद महत्वाचा!! मुल आपल्याला बदलतात मुलासोबत वाढंताना मुल काय आहेत, मुलांच्या जगात काय चालत हे आता मला समजायला लागलं आहे. मुलासोबत शिकता शिकता माझ्यातला चागंला माणुस बणण्याचा एक एक वर्तुळ पुर्ण होतोय.
आमचा एक अमित नावाचा आमच्याकडे शिकायला येणारा मुलगा, (नाव बदलल आहे) एरवी त्याला घरच्या परिस्थितीमुळे घालायला त्याला व्यवस्थित कपडे नसायचे. बाबा त्याचा गावातल्या गाई राखण्याच काम करतो (गुराखी) आहे. महाशिवराञी च्या निमित्ताने त्याच्या मामाने त्याला एक टि शर्ट आणून दिली. आज अमित खुप खुश होता, सारखा टि र्शट च्या बाह्या सरकवत होता. तांड्यात रसत्याने डेरिंगने तो चालत होता. मी त्याला दिसल्यावर म्हणाला दादा आज संध्याकाळी वर्ग नाही भरणार का? चला न. मी म्हटल अरे अमित आज सुट्टी आहे न. पुढे अमित म्हणाला दादा तो डिगा आहे न मला (ढांडा) बैल म्हणून चिडवतो. मी म्हटल का पण? अमित म्हणाला आस्सच माहीत नाही. मी अमित ला सांगीतल डिगा ला मी समज देणार आस्स बैल म्हणून चिडवन चागंल नाही म्हणून. नतंर अमित महादेव मंदीराकडे धावत गेला तिथे मुल जमली होती. अमित सारखे असे अनेक तांड्यावरची मुल माझ्याकडे येऊन रोज व्यक्त होतात. शिकण, शिकवण यापेक्षा या मुलांच्या मनात खुप गोष्टी लपून असतात या गोष्टी त्यांना माझ्याकडे सांगाव्या वाटतात या गोष्टी समजून घेतल्या पाहीजेत. हे मला लक्षात येत आहे. मुलांना शिक्षण देणार्‍या जवळ सुरक्षित वाटन हे आनदंदायी शिक्षणाची पहीली पायरी आहे अस मला वाटत. ते काम तस वातावरण मुलामुलींना देण्याचा प्रयत्न आम्ही झेप संस्थेच्या माध्यमातून करतोय याच मला मोठ समाधान आहे !! #educationmatter #education#learning📚 #ruralindiaeducation #learn #nature #kids👼🏽 #teachers #classroom #Zeporg#Aksharbhumi.

Comments

Popular posts from this blog

कोळशांची गंमत.

रेषांच्या वाटेने शिकण्याचा आनंद.

जगण्यासाठीच्या सवयींपासून सजग शिक्षणाकडे !!