शाळेचा दुसरा दिवस..

शाळेचा दुसरा दिवस.. मयूरेश चा आज सेंटर मध्ये येण्याचा दुसरा दिवस होता, वर्गात तो शेवट च्या चटई वर बसला होता. सोबतीला त्याच्या शेजारी तेजू बसली होती, मयुरेश च लक्ष सेंटर च्या भिंती वर रंगवलेल्या चित्रावर जात होत, तो प्रत्येक चित्र खूप लक्ष देऊन पाहत होता, नंतर मयुरेश सेंटर मधल्या कपाटा कडे पाहत होता, वरती ठेवलेल्या पुस्तकांच्या गठ्ठ्या वर त्याची नजर जात होती. नंतर मग प्रार्थनेची वेळ झाली आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना दिल्या मुलमुली सेंटरच्या वऱ्हांड्यात जमली, राष्ट्रगीता पासून प्रार्थनेला सुरुवात झाली. मग सेंटर मधल्या दादा ने भारतीय संविधानाची प्रस्ताविका वाचली मुल दादाच्या मागे मागे म्हणत होती.
मयुरेश पहिल्या दिवशी त्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेला होता, सेंटर मध्ये आल्यावर त्याने सांगितले सरांनी त्याला छडी मारली होती, आम्ही त्याच कारण विचारलं तर मयुरेश म्हणाला माझ वर्गात मन लागत नव्हतं, मी सारखा शाळेच्या दरवाज्या मधून घराकडे यायला गडबड करत होतो त्यामुळे मला सरांनी हातावर छडी मारली. मयुरेश सहित आम्ही सेंटर मधल्या इतर मुला मुलींना अंक वाचन करायला सांगितल परंतु मुल ती व्यवस्थीत वाचत नव्हती. सेंटर मधल्या दादा नी एक युक्ती केली, वर्गातल्या सुरज ला विचारलं तुझ्या घरी पाणी भरण्यासाठी च्या किती भरण्या आहेत, सुरज हातावरचे बोट मोजायला लागला पुढे सुरज म्हणाला तीन मोठ्या भरण्या आहेत, आणि एक लहान भरणी आहे. सेंटर मधल्या दादांनी सांगितलं टोटल किती भरण्या झाल्या. लगेच दिव्या म्हणाली चार झाल्या दादा त्या प्रमाणे दादा ने वर्गातल्या फड्यावर अंक लिहिले. पुढे सेंटर मधला दादा प्रत्येक मुलांच्या घरच्या वस्तू मोजायला लाऊन ते फड्यावर लिहत होता आणि मुलांना ही लिहायला सांगत होता. या दरम्यान मुल घरातल्या वस्तू चा आकार आणि रंगाबद्दल ही सांगत होती. आणि मुलांना अंकाची ओळख होत होती. मयुरेश वस्तू मोजणीच्या प्रकियेत उत्सहाने सहभागी होत होता. ---

Comments

Popular posts from this blog

कोळशांची गंमत.

जगण्यासाठीच्या सवयींपासून सजग शिक्षणाकडे !!

अंतरंग