अंतरंग
अंतरंग
आज अक्षरभूमी मध्ये माइंड मापींग लेसन घेतलं नेहमी प्रमाणे वर्गात मी मुलांना सांगितले तुमच्या मनात काय विचार येत आहे हे प्रत्येकाने एका शब्दात सांगा मुलांनी सांगितले मला कंटाळा येत आहे, मला भूक लागली आहे, मला शरम वाटत आहे अस सगळं सांगितलं. नंतर मी मुलांना विचारलं काल बेड्या वर, तुमच्या घरी किंवा तुमच्या सोबत काही झालं का आणि ते मला सांगू शकाल?
लगेच गायत्री नावच्या मुलीने सांगितले होय दादा काल ना आमच्या बेड्या वरच्या मुलाने ओषध (Poison) घेतली आणि पुढे गायत्री ने झालेला सगळा घटना क्रम सांगितला ज्या ठिकाणी त्या तरुणाने ओषध घेतली तिथून बाहेर गावच्या लोकांनी त्याला दवाखाण्यात उचलून नेलं.
झालेल्या प्रकाराने बेड्या वरील बाया माणसं घाबरून गेली होती अस गायत्री म्हणाली. वर्गात ही गोष्ट गायत्री ची ऐकतांना इतर मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. मोठ्या माणसांच्या कृतीच लहान मुलावर परिणाम होतो अस वर्गातल्या मुलांकडे पाहून वाटतं होत. मोठ्या माणसांच्या अनेक गोष्टी वर लहान मुलाच लक्ष असतं हे गायत्रीच्या गोष्टीतून मला समजलं.
पुठे दिपिका म्हणाली माझा बल्या दादा रात्री शिकारी साठी गेला होता, जंगलात सश्या साठी वाघरा मांडलेल्या होत्या आणि वाघरा च्या दूर झाडाला बल्या दादा दबून बसलेला रात्री अकरा वाजता च्या दरम्यान म्हणतात वाघ आला आणि मांडलेल्या वाघरा वरून उढी मारून गेला. बल्या दादा घाबरून त्या वाघरा तिथेच तशा ठेवल्या आणि धावत बेड्या वर आला.
गायत्री आणि दिपिका च्या या गोष्टी एकूण झाल्यावर मला एका विषय सुचला आणि मी मुलांना सांगितल आज आपण ओषधी बद्दल माहिती घेऊया ओषधी का बनवतात त्याचा उपयोग फायदा तोटा या सगळ्या गोष्टीवर चर्चा करूया अस मी म्हणालो मुल हाव म्हणाली. पुढे फळ्यावर मी ओषध हे नाव लिहिलं आणि मुलांना विचारलं तुम्हाला ओषधीच्या उपयोगा बद्दल सांगता येईल का? मुलांनी सांगितलं अळ्या मारण्यासाठी, फवारण्यासाठी, उंदीर मारण्यासाठी, झाड, पिक, फळ जगवण्यासाठी ओषधीचा वापर करतात अस सांगितलं.
मुलांसोबतच्या या चर्चे मधून फळ्यावर खूप मोठी नावाची यादी जमा झाली. या लेसन मध्ये एक महत्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे सगळी मुल शिकण्याच्या चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी होती मांइंड मापींग च्या या लेसन मुळे मुलामध्ये भाषा विकासाला मदत झाली, आनंद दाई आणि संवादाने शिकण्याची ही प्रक्रिया मुलांना खूप आवडली. !!
- साहेबराव


Comments
Post a Comment