मुलांचे प्रश्न !!

नेहमी प्रमाणे संध्याकाळी झेप लर्निंग सेंटर मध्ये वर्ग भरायला आम्ही जमलो. दिव्या, पारू, मयुरेश, प्रशांत पूर्वा अशी सगळी मुल सेंटर वर आली. आज ही मुल सेंटर मध्ये येऊन नुसती धिंगाणा करत होती. वर्गात इकडे तिकडे लोळत होती. मध्ये दिव्या आणि पूर्वा मला येऊन म्हणाली दादा आम्हाला ना तुम्हाला डान्स करून दाखवायचा आहे. मी होय दाखवा म्हटल्यावर दिव्या आणि पूर्वा राधा हे गात गात डान्स करून दाखवायला लागल्या, नंतर बायको नखरेवाली हे गान गात डान्स करायला लागल्या त्याच्या मध्ये मयुरेश आणि सुरज ही येऊन डान्स दाखवत होता. मुलींचा डान्स झाल्या नंतर पारू नी आपलं शाळेतलं पुस्तक आणलं आणि कविता वाचून दाखवायला सुरवात केली मला न विचारता उद्देश होता दादा नी माझ ऐकल पाहिजे माझी स्तुती केली पाहिजे. तुकाराम धांडे नी लिहिलेली रानवेडी ही कविता होती पोर डोंगराव भाळली रान गवताची फुलं तिच्या कानामधी डूल अस काहीस वाचतांना मला मुलांच्या बडबड मध्ये ऐकू आलं.
नंतर दिव्या जवळ येऊन मला म्हणाली दादा मी नारे घेणार आहे शाळेत २६ जानेवारी ला मी म्हटल अरे वाह खूपच छान. आज सेंटर मध्ये मला दुसर काहीही शिकवायला जमलं नाही. रात्री घरी आल्यावर मला प्रश्न पडले ही मुल रोज सेंटर मध्ये येऊन अस का दंगा करतात, चांगली शांत का बसत नाही याचा मी शोध घेतला. मला प्रशांत चा चेहरा डोळ्या समोर आला प्रशांत च घर हे माझ्या घराच्या अगदी जवळ आहे. रोजच्या निरीक्षणा नुसार त्याच्या घरात प्रशांत च कोणीही ऐकत नाही. आज पर्यंत प्रशांत ने त्याच्या आई बाबाकडे कोणतीही आवडणारी गोष्ट, वस्तू मागितली मला आठवत नाही. घरी शिस्तीत अभ्यास करायचा, शाळेत दिवसभर हात बांधून शिक्षक जे सांगेल ते ऐकायचं आणि लिहायचं आणि परत घरी यायचं. प्रशांतच बालपण शिस्त आणि संस्कार नावाच्या कारागृहात दबलं जात होत. प्रशांत ला अभिव्यक्त होण्याच स्वातंत्र्य फक्त झेप लेर्निग सेंटर मध्ये मिळत. म्हणून तो आणि त्याच्या सोबतची अशी अनेक मुलमुली सेंटर मध्ये खोडकरपण करतात हे मला समझलं. झेप लर्निंग सेंटर मध्ये शिकायला येणाऱ्या मुलाबरोबर शिक्षणावर काम करतांना मला समजलं खरच आपल्या मुलाचं आपण एकत असतो का, मुलांना आपल्या रोजच काहीतरी सांगायचं असतं, मुलामध्ये लहानपणा पासून चांगल्या गोष्टी असतात हे मला समजलं. - साहेबराव राठोड

Comments

Popular posts from this blog

कोळशांची गंमत.

रेषांच्या वाटेने शिकण्याचा आनंद.

जगण्यासाठीच्या सवयींपासून सजग शिक्षणाकडे !!